मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेने एका महिन्यापूर्वी अलर्ट जारी करुनही एक दहशतवादी मुंबईच घुसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे झोपलेल्या पोलिसांची आता चांगलीच पळापळ झाली आहे. दरम्यान, या दहशतवाद्याचे नाव सरफराज मेमन असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा एनआयएने पाठवलेल्या इ-मेलमध्ये मुंबई पोलिसांना २४ तास अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
चीन व हाँगकाँगमध्ये ट्रेनिंग
या ई-मेलमध्ये दिलेल्या माहितीत, सरफराज मध्य प्रदेशाचा असल्याचं म्हटलं आहे. त्याने चीन व हाँगकाँगमध्ये ट्रेनिंग घेतली असल्याचे समोर येत आहे. एनआयएने मुंबई पोलिसांना सरफराजचे आधार कार्ड, चालक परवाना व पासपोर्टही मेल केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी इंदूर पोलिसांशीही संपर्क साधला आहे.
काही दिवसांपूर्वीच धमकीचा ईमेल
फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच एनआयएला एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवला होता. त्यात त्याने आपण तालिबानी असल्याचा दावा केला होता. तसेच मुंबईत अतिरेकी हल्ला करण्याची धमकीही दिली होती. एनआयएने या प्रकरणी मुंबई पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम समजावून सांगितला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत अलर्ट जारी करण्यात आला होता.