मुंबई: आज मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. मराठी राजभाषा गौरव दिनी मुख्यमंत्री शिंदेंनी ही ग्वाही दिली आहे.
विधानसभेत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला. छगन भुजबळ म्हणाले “कुसुमाग्रजांची आज जयंती आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेल्या १४ वर्षापासून आपण प्रयत्न करत आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठी गरजेचे असणारे चारही निकष आपली मराठी भाषा पूर्ण करते. असे असताना देखील अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. लवकरात लवकर हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.” त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे असून त्यांना त्याबाबत विनंती देखील करणार आहे”.
आशिष शेलार म्हणाले की, “आज मराठी भाषा गौरव दिन आहे. महाराष्ट्रासह हा दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जातो. दिल्लीत या संदर्भात गोष्टी मांडल्या आहेत. यासाठी सर्व पक्षांनी एप्रिल महिन्यात या संदर्भात दिल्लीला जाऊन भेट घेतली पाहिजे.”
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…