पुणे: कसबा-चिंचवड मतदारसंघात मतदान सुरु असताना रुपाली ठोंबरे यांच्याकडून मतदानाच्या गोपनियतेचा भंग झाला आहे. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढला आहे. हा फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामुळे मतदानाच्या गोपनियतेचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी आत मोबाईल नेला कसा, निवडणूक आयोग काय कारवाई करणार आदी प्रश्न त्यांच्या पोस्टवर विचारले जात आहेत.