Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

पुणेकरांची मतदानाऐवजी वामकुक्षीला पसंती, फक्त 'इतके' मतदान

पुणेकरांची मतदानाऐवजी वामकुक्षीला पसंती, फक्त 'इतके' मतदान

पुणे: पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानाकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याचं दिसलं. कसबा विधानसभा मतदार संघात ४५.२५ टक्के मतदान पार पडलं तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ४१.१ मतदान पार पडलं.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये तर आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे.

गिरिश बापटांनीही केले मतदान

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. अवघा काहीच कालावधी मतदानासाठी शिल्लक असताना भाजपा खासदार गिरीश बापट हे व्हिलचेअर वरुन मतदान करण्यासाठी पोहचले.

Comments
Add Comment