मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाडमध्ये नुकतेच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुरबाड तीन हात नाका येथून रॅली काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तर स्वतंत्र सैनिक वीरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्याही पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रीय एनआरपी पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष बिपिन कटारे, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रदीप रोकडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष अॅड दिनेश ठाकरे आदी उपस्थित होते.