मुंबई (वार्ताहर) : महिला प्रीमियर लीगकरिता मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर संघामध्ये सामील झाली. मुंबई इंडियन्सने रविवारी एक व्हीडिओ शेअर हरमनप्रीतचे स्वागत केले.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत हरमनप्रीतच्या एन्ट्रीपूर्वी तिचे सहकारी खेळाडू कोणीतरी खास येत आहे, अशी चर्चा करताना दिसत आहेत. त्यानंतर हरमनप्रीतची एन्ट्री होते. ती मुंबई संघाचे खास जॅकेट घालताना दिसते. तसेच व्हीडीओच्या अखेरीस हरमन आली रे असे मराठीमध्ये बोलतानाही ती दिसून आली आहे.