
कराची (वृत्तसंस्था) : पाकिस्तान सुपर लीग २०२३ दरम्यान स्टेडियममधील कॅमेरे चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये लावलेले एक, दोन नव्हे तर तब्बल आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर चोरांनी हात मारला. त्यासोबतच फायबर केबल्स आणि जनरेटरच्या बॅटऱ्याही चोरांनी पळवून नेल्या.
पीएसएलवर लक्ष ठेवण्यासाठी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये कॅमेरे लावले होते. स्टेडियममध्ये लावलेल्या या कॅमेऱ्यांपैकी आठ सीसीटीव्ही कॅमेरे चोरांनी पळवून नेले. एवढेच नाही तर सुरक्षा कॅमेऱ्यांशिवाय चोरट्यांनी फायबर केबल्स आणि जनरेटरच्या बॅटऱ्याही पळवून नेल्या. लाइव्ह रेकॉर्डिंग आणि मॉनिटरिंगसाठी हे सर्व साहित्य अत्यंत महत्त्वाचे होते. चोरीला गेलेल्या साहित्यांची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुलबर्ग पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.