उज्जैन: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल लग्नाच्या एका महिन्यानंतर बाबा महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. रविवारी सकाळी बाबा महाकालच्या धाममधील नंदी हॉलमध्ये २ तास ओम नमः शिवायचा जयघोष करत दोघांनीही आरतीचे दर्शन घेतले.
अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी बाबा महाकालची विधिवत पूजा केली. त्यानंतर पूजाअभिषेक करून आरती केली व बाबांचे दर्शन घेतले. २३ जानेवारी २०२३ रोजी या दोघांनी खंडाळा येथे दोघांचे लग्न झाले होते.
जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग बाबा महाकाल यांचे निवासस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. बाबांच्या धाम दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भक्त येतात, मग ते सामान्य असो किंवा व्हीआयपी.
पिवळ्या धोतीमध्ये केएल राहुल आणि पिवळ्या साडीत अथिया शेट्टी अतिशय सुंदर दिसत होते. केएल राहुलने भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वात मोठा क्रिकेट संघ व्हावा, अशी प्रार्थना बाबा महाकाल यांच्याकडे केल्याचे समजते.