Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

अरुण गवळी यांच्या भावाचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

अरुण गवळी यांच्या भावाचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाकडून पक्षचिन्ह आणि पक्षनाव मिळाल्यानंतर राज्यात त्यांच्या समर्थकांची संख्या वाढताना दिसते आहे. आता भायखळ्यामधूनही एक मोठी बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचे बंधू प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.


त्यांच्यासह मुंबईतील भायखळा परिसरातील यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं शिवसेना पक्षात जाहीर स्वागत केलं.


बाळासाहेब ठाकरे आणि अरुण गवळी यांचे एकेकाळी चांगले संबंध होते. मात्र काही कारणांनी बाळासाहेब आणि अरुण गवळी यांच्यात अंतर वाढलं. त्यांच्या दुरावा निर्माण झाला. परंतु आता बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर त्याच शिवसेनेत प्रदिप गवळी आणि वंदना गवळी यांनी प्रवेश केल्याने भायखळा मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment