
मुरबाड: तालुक्यातील म्हसा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लॅब पुर्ण जळून खाक झाली आहे. ही घटना आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. अमोल गायकवाड यांच्या मालकीच्या या लॅबचे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
कुर्ले- भोईर बिल्डिंग येथील या लॅबला आग लागताच म्हसा ग्रामपंचायत तसेच म्हसा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळू पष्टे आणि गावकरी धावून आले. त्यावेळी मुरबाड येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. परंतु अग्निशमन दल येण्याआधीच ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.