Friday, July 11, 2025

भिवंडीतील पाणीपुरवठा योजनांचे कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

भिवंडीतील पाणीपुरवठा योजनांचे कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

भिवंडी: जलजीवन मिशन अंतर्गत ४८ गावांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा एकत्र भूमिपूजन सोहळा आज अंबाडी येथे केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्थानिक आमदार शांताराम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या योजनांसाठी १४३ कोटी खर्च केले जात आहेत.


तर तालुक्यातील केवणी दिवे, वडू नवघर, कोपर, टेंभिवली, जूनांदुर्खी, कांबे, खोणी, तकवाड, अनगाव, आवळे, अंबाडी, झिडके या १२ ग्रामपंचायतींच्या गावातील योजनांचे भूमिपूजन केवणी येथे झाले.


या योजनांमुळे भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असून ग्रामीण भागाला याचा मोठा फायदा होईल अशी माहिती केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी दिली.



जलजीवन मिशन नेमके काय?


देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हरघर जल, हरघर नळ संकल्पने अंर्तगत जलजीवन मिशन राबवण्यात येत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सहभागातून ही योजना होत असून तालुक्यातील १९६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा