Wednesday, July 2, 2025

शाळकरी विद्यार्थ्यांची व्हॅन भररस्त्यात पेटली

शाळकरी विद्यार्थ्यांची व्हॅन भररस्त्यात पेटली

सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथील हायस्कूलची मुले शाळेत घेऊन जात असलेल्या एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना लोणंद शिरवळ रोडवरील शेडगेवाडी फाट्याजवळ घडली.


सदर व्हॅनमध्ये शेडगेवाडी येथील ८ ते १० विद्यार्थी होते. मात्र व्हॅनने अचानक पेट घेतल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले.


ही स्कूल व्हॅन सीएनजीवर चालवली जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीत स्कूल व्हॅन मात्र संपूर्ण जळून खाक झाली.


या स्कूल व्हॅनचा चालक हा वाठार कॉलनी येथील हायस्कूलचाच शिपाई असल्याचे समजते. या अपघाताने स्कूल व्हॅनच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >