Thursday, July 10, 2025

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा मृत्यू

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा मृत्यू

ठाणे: नौपाडा येथील हॉटेल स्वाद जवळ 'सत्य नीलम'चे बांधकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून २ कामगारांचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ठाण्यातील नौपाडा परीसरात स्वाद हॉटेल जवळ 'सत्य नीलम' या इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी मातीचा मोठा ढिगारा अंगावर पडून तीन मजुर त्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व नौपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी धाव घेत मदत कार्य सूरू केले.


सदर घटनास्थळी अडकलेल्या तिन्ही व्यक्तींना बाहेर काढून सिव्हील रूग्णालय ठाणे येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तीन व्यक्ती पैकी दोन व्यक्तींना मृत घोषित केले आहे. मुंब्र्यातील शिवाजी नगर येथे राहणारे निर्मल रामलाल राब (४९ वर्ष) जखमी असून त्यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे. तर मुंब्र्यातील शंकर मंदिर येथे राहणारे हबीब बाबू शेख (४२ वर्ष), तिसऱ्या व्यक्तीचं नाव रणजीत असून ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

Comments
Add Comment