मुंबई: तुमच्या सोबत असं झालंय का? की तुम्ही तुमच्या युपीआय आयडीवरुन घाई घाईत चुकून दुसऱ्या कुठल्यातरी आयडीमध्ये पेमेंट केले आहे. पण, दुसऱ्याला गेलेले पैसे परत मिळवू शकता.
यासाठी अॅप सपोर्टशी संपर्क साधा. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, युजरने सगळ्यात आधी पेमेंट सर्व्हिस प्रोवायडरशी संपर्क साधावा. तुम्हाला जीपे, फोन पे, पेटीएम यापैकी किंवा कोणतेही दूसरे पेमेंट प्रोवायडर असेल तर त्यांच्या कस्टमर केअर सपोर्टवर कॉल करुन घडलेला प्रकार सांगावा लागेल. तुम्ही येथे समस्या फ्लॅग करू शकता आणि पैसे परत करण्याची विनंती करू शकता.
जर युजरला कस्टमर केअरकडून कोणतीही मदत मिळाली नाही, तर तो एनपीसीआय पोर्टलवर तक्रार करू शकतो. तक्रार कशी करायची ते पाहा. सर्व प्रथम एनपीसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर What we do या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर युपीआयवर क्लिक करा. येथे Dispute redressal Mechanism चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला व्यवहार तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
तपशील प्रविष्ट केल्यानंतर, जेथे कारण विचारले जाईल, तिथे चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या खात्यात हस्तांतरित, हा पर्याय निवडा. त्यानंतर तक्रार दाखल केली जाईल. यानंतरही कोणताही तोडगा निघाला नाही, तर तुम्ही तुमची तक्रार पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँक आणि ज्या बँकेत पैसे पाठवले आहेत त्या बँकेकडे करू शकता.