पुणे : श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सदस्य अक्षय गोडसे यांचा पाठिंबा भाजपचे हेमंत रासने की काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना याबाबत संभ्रम निर्माण केला जात असताना, गोडसे यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. त्यांचा पाठिंबा भाजपचे हेमंत रासने यांनाच असल्याचं अक्षय गोडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
मी आधी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रविंद्र धंगेकरांना आमचा पाठिंबा आहे असं म्हटलच नाही. ते आमच्या घरी आले होते. त्यानंतर मी त्यांना फक्त शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीओ केला. पण आमचा पाठिंबा हेमंत रासनेंनाच आहे, असं अक्षय गोडसे म्हणाले.
पुढे अक्षय गोडसे म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्यातही मी हेमंत रासनेंसोबत होतो. त्यांचं स्वागतही मीच केलं. रविंद्र धंगेकरांना फक्त शुभेच्छा दिल्या. पण आमचा पाठिंबा हेमंत रासनेंनाच आहे. रासने कुटुंबाच आणि आमचं ७०-८० वर्षांपासूनचं नात आहे. तर माझ्याकडे रविंद्र धंगेकरांचा नंबर सुद्धा नाही. माझा आणि त्यांचा जास्त संपर्क सुद्धा नाही. असं देखील अक्षय गोडसे म्हणाले आहेत.