नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत आयपीएलच्या आगामी हंगामाकरिता दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुरा ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्यात आली आहे. अष्टपैलू अक्षर पटेलकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. दिल्ली फ्रँचायझीच्या व्यवस्थापनाने याला दुजोरा दिला आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना दिल्ली कॅपिटल्सच्या मालकी गटाच्या सदस्याने सांगितले की, आयपीएलच्या आगामी हंगामाकरिता डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी, तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असले. यापूर्वी संघाची कमान ऋषभ पंतच्या हाती होती. अपघातामुळे पंत आयपीएलच्या १६व्या हंगामाला मुकणार आहे. यामुळे फ्रँचायझीकडून नवीन कर्णधारपदाची घोषणा करण्यात आली आहे.