मैनपूरी: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक चकित करणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील कर्हाळ येथे एका वधूने लग्न झाल्यानंतर सासरच्या घरी पोहोचण्यापूर्वीच पतीला अनोखी अट घातली. तिने अशी इच्छा व्यक्त केली की, मला सासरी जाण्याआधी मुलायम सिंह यांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे आहे.
घुसोपर सहान येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य सोबरान सिंह यादव यांचा मुलगा यतेंद्र यादव आणि वीरपूर गावातील रहिवासी राजवीर सिंग यांची मुलगी पलक यादव हिच्याशी विवाह झाला. वधूच्या अटीचा मान राखत लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडपे सैफई येथे पोहोचले आणि त्यांनी मुलायम सिंह यादव यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
नवविवाहित जोडपे सैफई येथे पोहोचताच तेथे लोकांची गर्दी झाली. तेथे पोहोचल्यानंतर दोघांनीही नेताजींच्या समाधीवर पुष्प अर्पण केले. यानंतर नवरी सासरच्या घरी गेली.