Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

शिवाजी महाराजांच्या उंच पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

शिवाजी महाराजांच्या उंच पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

कळवण (प्रतिनिधी ) : कळवण येथे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्याहस्ते १० मार्च रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी छ्त्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष भुषण पगार यांनी तालुक्यातील गावागावात जाऊन ग्रामस्थांना निमंत्रित करून संवाद साधत आहेत.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. तालुक्यातील कुंडाणे, ओतूर, शिरसमणी, भुसणी, दह्याने,बिजोरे, विसापूर, भादवन, गांगवन, नवीबेज, जुनीबेज, देसराणे, अभोणा, पाळे खुर्द, पाळे बुद्रुक सह इतर सर्व गावांमध्ये ग्रामस्थांशी भेट घेऊन अनावरण सोहळ्याची पत्रिका अध्यक्ष भुषण पगार यांनी सुपूर्द केली. नवीबेज येथे छ्त्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छ्त्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भुषण पगार यांनी शिवरायांची आरती करून अभिवादन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, बाजार समितीचे माजी सभापती धनंजय पवार, मविप्रचे माजी संचालक अशोक पवार, घनश्याम पवार, ॲड.भाऊसाहेब पवार, हरिभाऊ वाघ, विनोद खैरनार, चंद्रकांत पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. जुनीबेज, पिळकोस, बगडू येथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बगडू येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भुषण पगार यांच्या हस्ते करण्यात आले. पाळे खुर्द येथे अष्टभुजा देवी मंदिर आवारात ग्रामस्थांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी प्रभाकर पाटील, हेमंत पाटील, सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राकेश हिरे यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे महत्व अधोरेखित केले. राजेंद्र भामरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी ग्रामस्थ, छ्त्रपती स्मारक समितीचे सदस्य व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment