मीरा रोड: मीरा-भाईंदर महापालिकेच्या क्रीडा विभाग अंतर्गत शहरात आजपासून नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानात कला-क्रिडा महोत्सव सुरु झाला आहे.
२७ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या क्रिडा महोत्सवाचे विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्व वाढवावे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे हा मुख्य उद्देश असल्याचे उपायुक्त कल्पिता पिंपळे (क्रीडा विभाग) यांनी सांगितले. या क्रिडा महोत्सवात कबड्डी, लंगडी, खो-खो, लगोरी, धावणे, सांस्कृतिक स्पर्धा, खुला क्रिकेट या सारख्या अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. माहपालिकेच्या ३६ शाळांच्या विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत समावेश आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंना पालिकेकडून बक्षीसे देण्यात येणार आहेत.