Friday, May 9, 2025

क्रीडा

कोहलीबाबत खोचक ट्वीट आईसलँड क्रिकेटच्या अंगलट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत खोचक ट्वीट करणे आईसलँड क्रिकेटच्या अंगलट आले. सोशल मिडियावर विराटच्या चाहत्यांनी या ट्वीटवर आईसलँड क्रिकेटला धु धु धुतले.

'हे स्टॅट्स अनेक भारतीय चाहत्यांना आवडणार नाहीत. मात्र विराट कोहलीला कसोटी शतक ठोकून आता २३ कसोटी सामने झाले आहेत. त्याचे शेवटचे कसोटी शतक २०१९ मध्ये आले होते. अजून किती काळ?' असे ट्वीट आईसलँड क्रिकेटने केले होते.

विराट कोहलीने आशिया कप २०२२ मध्ये आपला शतकांचा दुष्काळ संपवला होता. यानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील पाठोपाठ शतकी खेळी केल्या आहेत. विराट कोहलीने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या दोन कसोटीत ४४, २० आणि १२ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर कोहलीला कसोटीत शतकी खेळी करण्यात यश आलेले नाही.
Comments
Add Comment