कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी विभागातर्फे कल्याण पश्चिम वाडेघर येथील श्रमिक सोसायटी मधील अनधिकृत कार्यालयाच्या बांधकामावर आणि चिकणघर गल्ली नं. ४ येथील अनधिकृत गाळ्याच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ब’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी आणि महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने केली.
तसेच ह प्रभागातही सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम कोपर क्रॉस रोड, जैन मंदिर शेजारी बांधकामधारक ब्रिजेश सिंग व सोमनाथ भोईर यांच्या ७ मजली अनधिकृत इमारतीच्या स्लॅब बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली. हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक अरुण पाटील व इतर कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि ४ काँक्रीट ब्रेकर व २० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.