लंडन : फुटबॉलमध्ये सामना रेफरीच्या अंगावर कॅमेरा लावून नवा प्रयोग केला जाणा आहे. मिडल्सब्रो, लिव्हरपूल, वॉर्सेस्टर आणि एसेक्सच्या खालच्या साखळी सामन्यांमध्ये रेफरीवर बॉडी-कॅमेराचा वापर सुरू केला जाणार आहे. बॉडी कॅमेऱ्याच्या मदतीने रेकॉर्ड केलेला व्हीडिओ खेळाडूच्या वर्तनाबद्दल चालू असलेल्या सुनावणीत वापरला जाऊ शकतो. रेफरीच्या अंगावर कॅमेरे लावल्याने खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीत सुधारणा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. बॉडी कॅमेरा मेकर लोअर लीगच्या १०० रेफरींवर हा प्रयोग करणार आहे.
फुटबॉलमध्ये बॉडी-कॅमेराचा प्रयोग?
