Wednesday, September 17, 2025

कल्याणमधील पोलिसांनी शोधले गहाळ झालेले ४४ मोबाईल

कल्याणमधील पोलिसांनी शोधले गहाळ झालेले ४४ मोबाईल

कल्याण : कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी सहा महिन्यात गहाळ झालेले साडे पाच लाख रुपये किमतीचे ४४ मोबाईल शोधले आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन, बस स्टँड, न्यायालय, तहसीलदार कार्यालय, सरकारी हॉस्पिटल, बाजारपेठ आदि वर्दळीच्या ठिकाणी मागील वर्षभरात नागरिकांच्या मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी अधिकारी, अंमलदाराचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते.

हे मोबाईल आज एसीपी उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, दीपक सरोदे यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले.

हरवलेला मोबाईल परत मिळेल याबाबत नागरिकांना विश्वास नव्हता. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आंनद दिसून आला. मोबाईल शोधून दिल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment