नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाकडे आल्यानंतर आता शिंदे गटाकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयावरही शिंदे गटाने ताबा घेतला आहे. उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी ही माहिती दिली.
लोकसभा सचिवालयाच्या उपसचिवांकडून अधिकृत पत्र जारी करत शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले आहे.