मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. तरीही काहीजण अजूनही शिंदे गट असेच उल्लेख करत असल्याने आता शिंदे गटाकडून ‘शिंदे गट नाही शिवसेना म्हणा’ असे एक पत्रक काढण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना मिळाले असून या पुढे माध्यमांनी शिंदे गट न उच्चारता ‘शिवसेना’ असे उच्चारावे, असे पत्र पक्ष सचिव संजय मोरे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.