Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे पक्षप्रमुखपद स्वीकारणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे पक्षप्रमुखपद स्वीकारणार!

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अधिकृतरित्या शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळताच शिंदे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील ताज प्रेसिडेंट येथे आयोजित केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित ही कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे. यामध्ये पक्षाची पुढील वाटचाल, पुढील ध्येय धोरणे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला शिवसेनेचे आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे पक्षप्रमुखपद स्विकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आजच्या कार्यकारिणीतीत कामकाज प्रस्ताव सादर होतील. तसेच मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्याता आहे. यापुढे दिल्या जाणाऱ्या एबी फॉर्मवर कुणाच्या सह्या असतील हेही आजच्या बैठकीत ठरवले जाईल. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या वतीने शाखांसोबतच पक्ष आणखी मजबूत करण्यावर भर असणार आहे. याचसाठी कार्यकारणी बोलवण्यात आली असून विविध प्रस्ताव सादर करण्यात येतील. तसेच ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांना व्हीप बजावण्यासाठी पत्र देण्यात येणार असून शिवसेना घराघरात पोहचवण्यासाठी व शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचे प्रयत्न केले जातील.

एकनाथ शिंदे आता आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा अयोध्या दौरा पुढच्याच आठवड्यात नियोजित केला असल्याची माहिती मिळाली आहे. अयोध्या दौऱ्यावरून आल्यानंतर तेथील महंतांनी दिलेले धनुष्यबाण राज्यभर फिरवले जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -