
भिवंडी : भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून कविता पंजनी या संगम पाडा येथील ३२ वर्षीय महिलेचा रोड क्रॉस करीत असताना कंटेनरच्या धडकेत चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहिती अशी की, कंटेनर खाडीपार हुन छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जात असताना कंटेनरची धडक लागल्याने महिलेचा जागीच चिरडून मृत्यू झाला.
अवजड वाहनांना शहरात बंदी असताना सुद्धा अशी वाहने शहरात सर्रासपणे ये-जा करीत असल्याने पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
कंटेनर चालकाला स्थानिक रिक्षाचालक व नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील कारवाई करीता मृतदेह स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आला आहे.
रवींद्र गुरव February 22, 2023 11:55 AM
भिवंडीत अशा घटना रोजच घडत अहेत,पोलीस फक्त बघत असतात.त्याना काहीच घेणेदेणे नाही.शेलार गावात रस्त्याचे काम चालूअसताना कोणत्याही पध्दतिने नियोजन न करता प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना रोज नागरिकांना करावा लागत आहे.फक्त हप्ते गोळा करणे एकच काम चालू आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना राजकीय नेते यांची शून्य जबाबदारी आहे का ?