पती आणि सासूची हत्या करुन मृतदेह फ्रीजमध्ये ठेवले

  115

गुवाहाटी: श्रद्धा वालकर नंतर निकिता यादव हत्याकांडाचे प्रकरण ताजे असताना आसामच्या गुवाहाटीतही अशा प्रकारची घटना घडली आहे. एका महिलेनं तिचा पती आणि सासूची हत्या करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवले. नूनमती परिसरातून तब्बल सहा महिन्यांनी हा प्रकार समोर आला. आरोपी महिलेनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.


बंदना कलिता असं आरोपीचं नाव असून तिनं पती अमरज्योती डे आणि सासू शंकरी डे यांची निर्घुण हत्या केली. त्यानंतर कलितानं दोघांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले. २१ ऑगस्ट २०२२ रोजी हा गुन्हा घडला. त्यानंतर ४ दिवसांनी कलितानं मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले आणि १७५ किलोमीटर अंतर प्रवास करून मेघालयातील दावकी शहरात मृतदेहाचे तुकडे पॉलिथिनमध्ये टाकून फेकून दिले होते.


पती आणि सासू बेपत्ता झाल्याची तक्रार खुद्द कलितानंच दिली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. काही दिवसांनी अमरज्योती यांच्या चुलत भावानंदेखील पोलीस तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांना महिलेवर संशय आला.


त्यानंतर पोलिसांना शंकरी डे यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. या प्रकरणी गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिगंता बाराह अधिक माहिती देताना, 'हत्या जवळपास सहा महिन्यांपूर्वी झाली आहे. आम्ही तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे,' असं सांगितलं.

या गुन्ह्यात आणखी दोन जणांनी आपली साथ दिल्याचं आरोपी महिलेनं पोलिसांकडे कबूल आहे. कलितानं घराची साफसफाई केल्यानंतर बेडवरील चादर आणि अन्य कपडे घराच्या टेरेसवर जाळले होते. त्यावेळी तिला शेजारच्या महिलेनं पाहिलं होतं. गुन्ह्यात महिलेला साथ देणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये