नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुप्रीम कोर्टाने आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. कोर्टाने त्यांना उद्या मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत येण्यास सांगितले आहे.
तीन दशकांपासून शिवसेनेची ओळख, शिवसेनेची अस्मिता असलेले धनुष्यबाण चिन्हच नव्हे तर शिवसेना हा पक्षही शिंदेना मिळाला. आता ठाकरेंच्या पक्षाला नव्या नावासाठी, नव्या चिन्हासाठीही संघर्ष करावा लागणार आहे. चिन्हाबाबत वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेले मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तात्पुरते होते. निकालात आयोगाने स्पष्ट म्हटले आहे की हे तात्पुरते नाव, चिन्ह कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक संपेपर्यंतच त्यांना वापरता येईल. पुन्हा मशाल मिळवण्यासाठी, नव्या पक्षाच्या नावासाठी त्यांना नव्याने प्रक्रिया करावी लागणार आहे.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…