पार्ल (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील दारूण पराभवामुळे महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव केला. बोलँड पार्कवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून १६२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ६० धावांवर आटोपला.
दरम्यान न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांचे ४ सामन्यांनंतर प्रत्येकी ४ गुण आहेत. परंतु, न्यूझीलंडचा रनरेट चांगला आहे. सध्या गटात दक्षिण आफ्रिकेचेही ४ गुण आहेत, मात्र त्यांचा १ सामना शिल्लक आहे. दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. दक्षिण आफ्रिका जिंकल्यास ऑस्ट्रेलियासोबत उपांत्य फेरीत प्रवेश करेल.