मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा व्यवहार २ हजार कोटी रुपयांमध्ये झाला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त करत संजय राऊत हा वेडसर माणूस आहे आणि सायको माणसाच्या विधानाला किती महत्व द्यायचे?, असे म्हणत संजय राऊत यांची तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी करत त्याला आता इंजेक्शन द्यावे लागेल, अशी खरमरीत टीका केली.
पिसाळलेल्या कुत्र्याला इंजेक्शन द्यावे लागते तेव्हा ते शांत होते. थोडे दिवस थांबा, योग्य वेळ आली की आम्ही इंजेक्शन देऊ, असेही शिरसाट म्हणाले.
सध्या संजय राऊत यांनी आमदारांना बजावण्यात येणाऱ्या व्हिपबाबत काळजी घ्यावी. पक्षाकडून बजावण्यात येणारा व्हिप जर पाळला गेला नाही तर आमदारांवर निलंबनाची कारवाई होईल, असेही संजय शिरसाट म्हणाले.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…