Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीट्विटरनंतर आता फेसबुक, इन्स्टाची मोफत सेवा बंद!

ट्विटरनंतर आता फेसबुक, इन्स्टाची मोफत सेवा बंद!

फेसबुक आणि इन्स्टाग्रामही ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे आकारणार

मुंबई : ट्विटरनंतर आता Instagram आणि Facebook साठीही ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे आकारले जाणार आहेत. स्वत: मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनीच सबस्क्रिप्शन सेवा सुरू झाल्याची माहिती दिली.

ही सेवा सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वापरकर्त्यांसाठी चाचणी आधारावर आणली जात आहे. चाचणीनंतर अमेरिकेतही सेवा सुरू करून ब्लू टिकसाठी पैसे आकारले जातील. वापरकर्त्याला वेबसाठी प्रति महिना ११.९९ डॉलर म्हणजे १००० रुपये आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी १४.९९ डॉलर म्हणजे १२०० रुपयांपेक्षा जास्त द्यावे लागतील. ही सेवा भारतात कधी लागू होणार याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

पेड सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये Instagram आणि Facebook वापरकर्त्यांना काही विशेष सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये यूजर्संना एचडी व्हिडिओ अपलोड करण्यासोबतच इतरही अनेक सेवा देण्यात येणार आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -