Saturday, July 20, 2024
Homeमनोरंजन‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात राज्यगीत...

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात राज्यगीत…

मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याला राज्यगीताचा दर्जा मिळाला. त्यावेळी ‘महाराष्ट्र शाहीर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत असणार आहे, अशीही माहिती केदार शिंदे यांनी दिली होती. त्यांनी सांगितलं की, अजय-अतुल हे या गाण्याला संगीतबद्ध करणार आहेत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी शाहीर साबळे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला.

शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर २०२२ ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान साजरे होत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिलीज होणाऱ्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा एक खास व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हीडिओला त्यांनी दिलेल्या कॅप्शनने अनेकांचे लक्ष वेधले. केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये अंकुश चौधरी हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसत आहे. या व्हीडिओला त्यांनी कॅप्शन दिले आहे, ‘फडकेल नव्याने भगवा, महाराष्ट्र पुन्हा गर्जेल, जनतेचा बुलंद आवाज… लेखणीतूनी बरसेल…देऊनी डफावर थाप… ललकारत होते जाहीर…अर्पितो तुम्हाला तुमचे… तुमचाच… ‘महाराष्ट्र शाहीर’… शाहीर साबळे ह्यांची भव्य जीवनगाथा २८ एप्रिल २०२३ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनीच केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -