Saturday, July 5, 2025

सोनू सूदच्या नावानं सर्वात मोठी थाळी लाँच

सोनू सूदच्या नावानं सर्वात मोठी थाळी लाँच

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सोनू सूदच्या एका चाहत्यानं सोनू सूदच्या नावानं देशातील सर्वात मोठी थाळी लॉन्च केली आहे. ही थाळी इतकी मोठी आहे की एकावेळी २० जण एकत्र बसून पोटभर जेवण करू शकतात. कदाचित २० जणांचं पोट भरेल पण थाळी काही संपणार नाही इतक्या पदार्थांचा समावेश या थाळीत करण्यात आला आहे.


खुद्द अभिनेता सोनू सूदनं या थाळीसोबतचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. सोनू सूद या फोटोंमध्ये एका थाळीच्या बाजूला उभे राहिलेले दिसून येतात. ही थाळी पूर्णपणे पदार्थांनी भरली आहे. देशातील सर्वात मोठी जेवणाची थाळी आता माझ्या नावानं ओळखली जाणार आहे, असं कॅप्शन सोनू सूदनं पोस्टला दिलं आहे. तसंच या थाळीसाठी @gismat_jailmandi चे आभार देखील सोनू सूदनं व्यक्त केले आहेत. गिस्मत अरेबिक मंडी रेस्टॉरंटनं ही थाळी लॉन्च केली आहे. या थाळीचं लॉन्चिंग कोंडापूर ब्रांचमध्ये झालं. यावेळी सोनू सूदसह इन्स्टाग्रामस्टार पद्दु पद्मावती देखील उपस्थित होती.






 










View this post on Instagram























 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)





सोनू सूदच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या थाळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या रेस्टॉरंटच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. थाळीची लांबी ८ फूट असून सुमारे २० लोक एकत्र बसून स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. याबद्दल बोलताना सोनू म्हणाला, "हैदराबाद हे स्वादिष्ट आणि अनोख्या पदार्थांचं माहेरघर आहे. खाद्यप्रेमींना एकाच थाळीत जास्तीत जास्त पदार्थांची चव चाखता यावी यासाठी या मोठ्या थाळीची संकल्पना इतक्या नावीन्यपूर्ण पद्धतीने आणण्यात आली आहे की आजपर्यंत कोणीही विचार केला नसेल". आपल्या नावानं लॉन्च होणाऱ्या या थाळीला पाहून तो खूप आनंदी होता.

Comments
Add Comment