Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजदातांचे आरोग्य

दातांचे आरोग्य

  • हेल्थ केअर: डॉ. लीना राजवाडे

तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. दात, हिरड्या यांचे आरोग्य यांचा विचारही यात करायला हवा. जन्माला आल्यानंतर कमीत कमी सहा महिन्यांपासून पुढे आयुष्यभर पदार्थ खाताना तो चावून, तोडून बारीक करून पोटात पाठवण्याचे महत्वाचे काम दात करतात. दात ज्या हिरड्यांमधून येतात त्या जेवढ्या सदृढ तेवढे दातांचे आरोग्य चांगले राहते.

पूर्वीची विको वज्रदंतीची जाहिरात आठवतेय? एक आजोबा त्यांच्या दाताने ऊस खातात, आक्रोड तोडतात. आज कोणाला ऊस तोडायला सांगितला, तर कदाचित त्यांची दातांची कॅप निघून येईल. हल्ली दातासाठी replacement आणि early
shor-term इफेक्टचे उपाय खूप निघाले आहेत. पुढील वाक्ये घराघरात सर्रास ऐकू येतात :
“दात सळसळ करत आहेत? sensitive टूथपेस्ट लावा.”
“तोंडाला वास येतोय? माऊथ वॉश आहे ना.”
“दातात खूप plaque जमते? सारखे खसाखसा ब्रश करा.”
“दात खराब झाला बदलून टाकू.”
“सारखा दुखतोय काढून टाकतो.”
आणि अशा सगळ्या त्रासांवर उत्तर आहेच. प्रत्येक गोष्टीला replacement उपलब्ध आहे. ·पण असे वाटते या जाहिरातीत दाखवलेल्या ‘सोप्या’ उपायांनी लोकांनी मुद्दाम दातांसाठी वेगळी काळजी घेणे बंद केले आहे.

दातांचे आरोग्य खालील काही गोष्टींनी साधारणपणे बिघडू शकते :

दाताची मूळ प्रकृती : यामध्ये आपण बदल करू शकत नाही. ·
आहार : सतत कोल्ड ड्रिंक्स, गोड खाऊन दात साफ न करणे, हाडांना बळकट करण्याचा आहार कमी असणे, आंबट, खारटसारखे खाणे किंवा वात वाढवणारा आणि पित्तकर आहार विहार. खाण्यात खारे काजू, खारे दाणे, फरसाण, लोणची, पापड यांचा अति वापर हे काही पदार्थ येतात.
नियमाने आंबट रस जास्त प्रमाणात : काही लोकांना रोज भरपूर लिंबू पिळून पाणी, अॅपल सायडर व्हिनेगर घ्यायची
सवय असते.
सवयी : तंबाखू, सिगारेट, सतत मद्यपान, पान सुपारी, मशेरी (खरखरीत असल्याने इजा पोहोचते.)
विहार : जागरण, काही सवयी : गार पाण्यावर चहा, चहावर गार पाणी, चहा नंतर लगेच गार पाण्याची चूळ भरणे.
जोरजोरात सारखे दात घासणे : दातातील नसा नीट ठेवणारा बाह्य स्तर यामुळे झिजतो व दाताला स्पर्श सहन होईनासा होतो. (सेन्सिटिव्ह टीथ)
कृमी : लहान मुलांमध्ये सतत जंत होत असतील तर त्यांना सतत गोड खाण्याची इच्छा होते व दातात कीड होऊन ते लवकर खराब होतात.
आजार : जुनाट आम्लपित्त, प्रमेह आयुर्वेद वैद्यकशास्त्रात स्वास्थ्य हा विषय प्राधान्याने सांगितलेला आहे. त्यात दिनचर्या म्हणजे प्रत्येक दिवशी करायच्या कर्मांचा समावेश आहे. अर्थात रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधीनंतर दन्तधावन विधी सांगितला आहे.
१. वरती जे आहार-विहार दाताच्या त्रासाची कारणे म्हणून सांगितले आहेत ते टाळणे.
२. दंत धावन : कडू रसाने दात घासणे अपेक्षित नाही. कडुनिंबाची काडी किंवा कोणतीही कडू रसाची काडी यात दाताने चावून खाणे अपेक्षित आहे. आता ते शक्य नसले तरी किमान या औषधीची पावडर हिरड्यांना धक्का न लावता, दात आणि हिरड्यांच्या सांध्याला हलके चोळून ठेवावेत. साधारण कडू, तुरट किंवा तिखट चवीचे दंतमंजन लावावे. तिळाचे किंवा खोबरेल तेल यात हे रस एकत्र करून लावावे, त्यामुळे तोंड साफ होते, लाळेतील चिकटपणा कमी होतो आणि तोंडाचा दुर्गंध देखील. यामुळे हिरड्या बळकट होतात, दाताचे पोषणमूल्य सुधारायला मदत होते.
३. कवल/गंडूष : तोंडात २ चमचे तेल धरून ते फिरवावे.
४. नस्य : नियमाने नाकात औषधी तेल घालणे हे खांद्यावरील सगळ्या भागांना बळकटी देणारे असते. मुख्यतः वय झाल्याने जे त्रास होतात उदा. केस गळणे, पांढरे होणे, ज्ञानेंद्रिय कमजोर होणे, दात अशक्त होणे – झिजणे – दुखणे हे कमी होतात किंवा त्यांचा वेग खूप मंदावतो. आयुर्वेदात दाताची प्रकृती नीट राहावी म्हणून दिनचर्येत अतिशय सुंदर उपक्रम आले आहेत. फक्त ब्रश आणि फ्लॉस नाही तर या उपक्रमांचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सातत्याने अवलंब व्हायला हवा.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -