Wednesday, April 30, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

स्मृती मानधनाची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदी नियुक्ती

स्मृती मानधनाची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदी नियुक्ती

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी स्मृती मानधनाची महिला प्रीमियर लीगसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस डब्ल्यूपीएलसाठी आरसीबीच्या कर्णधारपदाची घोषणा केली.

महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती मानधना ठरली पहिली कोट्याधीश

भारताची स्टार महिला खेळाडू स्मृती मानधनाला बंगळुरुच्या संघासाठी तिला तब्बल ३.४० कोटींची बोली लागली.

महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलमध्ये माजी कर्णधार मिताली राजची गुजराज जायंट्स संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर झुलन गोस्वामी ही मुंबई इंडियन्सची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

महिला आयपीएलचा थरार ‘या’ तारखेपासून

स्मृती मानधनाची आरसीबीच्या कर्णधारपदी नियुक्ती करताना, फ्रँचायझीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा म्हणाले, 'आमची धाडसी स्मृती. आम्ही तिच्याकडे नेतृत्वाची भूमिका सोपवली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की स्मृती आरसीबीला नवीन उंचीवर घेऊन जाईल.

डीवाय पाटील स्टेडियमवर ४ मार्चपासून लीग सुरू होणार आहे. गुजरात आणि मुंबई पहिल्या सामन्यात भिडतील. त्याच वेळी अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर २६ मार्च रोजी होणार आहे.

Comments
Add Comment