Wednesday, July 2, 2025

मशाल चिन्हावरही समता पार्टीचा दावा

मशाल चिन्हावरही समता पार्टीचा दावा

मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता निवडणूक चिन्हासंदर्भात ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी सातत्याने समता पार्टीकडून केली जात आहे. यासंदर्भात आता समता पार्टीकडून सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment