मुंबई : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता ते रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. रमेश बैस यांची जुलै २०२१ मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याआधी जुलै २०१९ ते २०२१ पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले होते तेव्हा त्यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.