Tuesday, July 1, 2025

आर. के. स्टुडिओनंतर राज कपूर यांचा बंगला विकला

आर. के. स्टुडिओनंतर राज कपूर यांचा बंगला विकला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला विकला गेला आहे. हा बंगला गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीने खरेदी केला आहे. नेमकी किती कोटींची डिल झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, कंपनीशी १०० कोटींचे डिल झाल्याचे बोलले जात आहे.


मुंबईतील चेंबूरमध्ये देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या बाजूला राज कपूर यांचा बंगला आहे. याच बंगल्याची विक्री झाली आहे. बंगल्याच्या आधी मे २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने आर. के. स्टुडिओ खरेदी केला होता. यानंतर आता राज कपूर यांचा हा बंगला विकला गेल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.


दरम्यान, दिवंगत राज कपूर यांचे वारस असलेल्या कपूर कुटुंबाकडून हा बंगला खरेदी करण्यात आल्याची माहिती गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीने दिली आहे. परंतु, हा बंगला किती कोटींना खरेदी केला, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Comments
Add Comment