Thursday, October 30, 2025
Happy Diwali

स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच

स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच

मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यानंतर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात असतानाच आता अभिनेत्री कंगना राणावतने देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कंगना राणावत आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगनाचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि कंगनाचा वाद चांगलाच रंगला होता. आयोगाच्या कालच्या निकालानंतर कंगनाने एक ट्विट केले आहे.

त्या ट्विट मध्ये तिने लिहिले आहे की, "वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही."

Comments
Add Comment