Tuesday, June 17, 2025

दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते भारतात दाखल

दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते भारतात दाखल

ग्वाल्हेर (वृत्तसंस्था): प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात ८ चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा हवाई दलाच्या विशेष विमानाने दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून आणखी १२ चित्ते भारतात दाखल झाले आहेत. या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ या विशेष विमानामधून ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे.


या १२ चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत. भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने भारतासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या अंतर्गत केंद्र सरकार प्रोजेक्ट चित्ता राबवत आहे.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे. हे चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना आधी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना मुख्य पार्क मध्ये सोडले जाणार आहे.






मोदी सरकारने १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात ८ चित्ते आणण्यात आले होते. या चित्त्यांची चर्चा देशभर चांगलीच झाली. नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले होते.
Comments
Add Comment