दिल्ली (वृत्तसंस्था) : फिरकीपटूंची चलती असलेल्या दिल्लीच्या खेळपट्टीवर चार स्पीनर्सना खेळविण्याची ऑस्ट्रेलियाची रणनिती पहिल्या डावात तरी यशस्वी ठरल्याचे दिसले. नॅथन लिऑनने ५ फलंदाजांचा अडथळा दूर करत यजमानांना अडचणीत टाकले. संकटात सापडलेल्या भारताच्या मदतीला अष्टपैलू अक्षर पटेल धावून आला. त्याने भारतातर्फे सर्वाधिक ७४ धावांची खेळी खेळत संघाला कसेबसे २६२ धावांपर्यंत पोहचवले.
शनिवारी सकाळचे पहिले सत्र भारतासाठी घातक ठरले. नॅथन लिऑनची जादू चालली आणि भारताची भलीभक्कम फलंदाजी गडगडली. रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा हे तिन्ही आघाडीचे फलंदाज स्वस्तात परतले. रोहितने ३२, तर लोकेशने अवघ्या १७ धावा जमवल्या. शंभरावा कसोटी सामना खेळणारा कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराला भोपळाही फोडू दिला नाही. ५४ धावांवर ३ फलंदाज बाद अशा अडचणीत भारतीय संघ सापडला. मिळालेल्या संधीचा श्रेयस अय्यर फायदा उठवेल असे वाटत होते. पण त्यालाही स्वत:ला सिद्ध करता आले नाही. लिऑनच्या अप्रतिम गोलंदाजीचा तो बळी ठरला. ६६ धावांवर प्रमुख ४ फलंदाज तंबूत परतल्याने संघाला सावरण्याची जबाबदारी अनुभवी विराट कोहलीसह अष्टपैलू खेळाडूंच्या खांद्यावर आली.
कोहली-जडेजा ही जोडी त्यातल्या त्यात बरी सेट झाली होती. पण जडेजाने अर्धवट साथ सोडली. जडेजाला २६ धावा जमवता आल्या. विराटने त्यातल्या त्यात बरा प्रयत्न केला होता. परंतु कुहनेमनच्या स्टम्पवर येणाऱ्या चेंडूचा तो शिकार ठरत पायचित झाला. कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक शिखर भरतला ६ धावा करता आल्या. लिऑनच्याच जाळ्यात तो अडकला. त्यानंतर अक्षर पटेल आणि रविचंद्रन या जोडीने भारताला खऱ्या अर्थाने सावरले. अक्षरने ७४ धावांची संघातर्फे सर्वाधिक धावांची खेळी खेळली. त्याला अश्विनच्या ३७ धावांची