Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सहॉटेल रॉयल पाम; कल्याण-मुरबाड

हॉटेल रॉयल पाम; कल्याण-मुरबाड

हॉटेल म्हटलं की खाद्याची खमंग मेजवानी आली, रसास्वाद आला. प्रत्येक हॉटेलची वेगळी अशी एक खासियत असते की, ज्यामुळे अनेक ग्राहकांची पावले आपसूकच या हॉटेलचे नाव ऐकताच त्या दिशेने वळतात. वेटिंगला राहतात. बुकिंगही केले जाते. त्यातलेच एक हॉटेल म्हणजे कल्याण तालुक्यातील रायता गाव कल्याण-मुरबाड हायवेला लागून रॉयल पामचा उल्लेख केला जातो.

कल्याण तालुक्यातील रायता गाव येथे हे प्रसिद्ध हॉटेल आहे. गिरीश माधवराव गडाक व त्यांची साथ देण्यासाठी त्यांचे मित्र अक्षय अनंत जाधव या दोन मराठी मुलांनी एकत्र येऊन रॉयल पाम हॉटेलची २०२० मध्ये निर्मिती केली.

गिरिश माधवराव गडाक हे मुंबईमधील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये २००० ते २००५ या काळात वेटरचे काम करत होते. त्यानंतर ते ०८ मार्च २००५ मध्ये हॉटेलच्या पुढील शिक्षणासाठी कुवेतला गेले. तेथे ते पार्ट टाइममध्ये निनो रेस्टॉरंटला रुजू झाले. तेथील कामाचा अनुभव घेऊन ते २००८ ला भारतात परत आले; परंतु त्याच वेळेस नेमका २६/११ ला ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाल्यामुळे त्यांना ताज हॉटेलमध्ये नोकरी मिळाली नाही. पण त्यांच्या सततच्या प्रयत्नाने त्यांना जून २००९ मध्ये जुहू येथील नोवेटेल या हॉटेलमध्ये टीम लीडरची नोकरी मिळाली.

काही वर्षे तेथे काम केल्यानंतर त्यांची कल्याणमधील मिग यॉग या प्रसिद्ध हॉटेलमध्ये मॅनेजर या पदासाठी निवड करण्यात आली आिण त्यांनी मिग याॅग या हॉटेलचा पदभार स्वीकारला; परंतु आपल्याला काहीतरी स्वत:चे करायचे, हे त्यांना आतून सतत वाटत होते. त्यामुळे त्यांनी २०२० ला मॅनेजर पदाचा राजीनामा दिला. या सर्व हॉटेल्सचा अनुभव घेऊन त्यांना पुढे एक हॉटेल निर्माण करण्याची उत्सुकता मनात निर्माण झाली.

रॉयल पाम हॉटेलची स्थापना नोव्हेंबर २०२० साली झाली. सुरुवातीला गिरीश गडाक यांना खूप अडचणी आल्या. जागेची अडचण, पैशाची अडचण; परंतु यात त्यांना साथ मिळाली त्यांच्या घरच्यांची व मित्राची म्हणजेच त्यांचा पार्टनर अक्षय अनंत जाधव या दोघांनी हॉटेलची उभारणी केली.

आज हे रॉयल पाम हॉटेल नावारूपाला आले आहे. सध्या रॉयल पाम हॉटेल घरपोच सेवा सुद्धा देत आहे. कल्याण, मुरबाड, आमणे, सरळगाव, टिटवाळा, गोविली, वावोली, आप्पी, बापसई, सेंच्युरी, म्हारळ, शहाड, उल्हासनगरपर्यंत िदली जाते.

नेहमी नवनवीन महाराष्ट्रीय, पंजाबी, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, आगरी पद्धतीचे जेवण तसेच चुलीवरील जेवण त्यांची खासियत आहे. ५०/६० जणांसाठी पार्टीची सोयसुद्धा त्यांच्याकडे आहे. एसी हॉल, ओपन ग्राऊंड तसेच पार्किंगची उत्तम सोय ही या हॉटेलची खासियत. त्यांचे ब्रीदवाक्य ‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे आिण ते वाया घालवू नका’.

पत्ता – हॉटेल रॉयल पाम, कल्याण-मुरबाड रोड, मेन हायवेच्या बाजूला,
मो. ९९६७०५१५८२

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -