‘हृदयी प्रीत जागते’ ही एक तरुण संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मालिकेचा नायक रॉक बॅड परफॉर्मर आहे, तर नायिका कीर्तन गायिका आहे ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे.
कॉन्सर्टच्या शेवटी प्रभास वीणाला प्रपोझ करतो. पण ती त्याला उत्तर देऊ शकत नाही. वीणा घरी आल्यावर बघते, तर बाबा प्रचंड भडकले आहेत, या सर्व प्रकारामुळे बाबा वीणाचं गाणं बंद करतात. प्रभास वीणाला भेटायला तिच्या घरी येतो. तेव्हा बाबा त्याला निघून जायला सांगतात. प्रभासच्या लक्षात येतं की, वीणाचं ही त्याच्यावर प्रेम आहे. पण बाबांमुळे ती व्यक्त होत नाहीये. बाबा आणि प्रभास यांच्यात मोठा वाद होतो. प्रभास गावात थांबण्याचा निर्णय घेतो. देवाला साकडं घालतो. प्रभासला होणाऱ्या त्रासाने वीणा खूप तळमळते. ही गोष्ट शैलजाला कळते. ती प्रभासला न्यायला संगमनेरला येते. तेव्हा तिला समजतं की, मनोहरचं लग्न झाले असून वीणा ही त्याचीच भाची आहे. शैलजा प्रभासला घेऊन तडकाफडकी निघते. प्रभासची वीणासाठीची तळमळ बघून शैलजा त्यांचं नातं स्वीकारेल की नाकारेल? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.