Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

जय भोलेनाथ, हर हर महादेव, ओम नम: शिवायच्या जयजयकारात देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.


Mahashivratri in Allahabadमुंबई- देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जय भोलेनाथ, हर हर महादेव, ओम नम: शिवाय या जयगजरांनी परिसर दुमदुमला आहे.


शिवलिंगावर दुधाचा अभिषेक घालण्यासाठी भाविकांनी देशभरात ठिकठिकाणच्या शिवमदिरात प्रचंड गर्दी केली आहे.


जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून कोलकात्यापर्यंत सर्वत्र उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे.


महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादमधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.  तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथेही लाखो शिवभक्तांनी दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे.


नाशिक येथे हजारो भक्तांनी गोदावरी नदीत पवित्र स्नान करुन कपालेश्वराचे दर्शन घेतले.


दर्शन सुलभ व्हावे आणि मंदिर सुरक्षेसाठी पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. महत्त्वाच्या आणि प्रचंड गर्दी असणा-या मंदिरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.


Mahashivratri in Srinagar Mahashivaratri in Jammu Mahashivratri festival in Allahabad Mahashivratri in Bhopal

Comments
Add Comment