मुंबई : मुंबई पोलीस दलामध्ये सध्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. सांताक्रुझच्या कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर एका उमेदवाराचा आज सकाळी मृत्यू झाला. मैदानी चाचणीत धावताना चक्कर आल्याने हा तरुण कोसळला. गणेश उगले हा २७ वर्षाचा तरुण वाशिम येथून पोलीस भरतीसाठी मुंबईला आला होता.
गणेशने १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. गणेश हा चुलत भावासोबत मुंबईत आला होता.