मुंबई : निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व असून अखेर सत्याचा विजय झाला. हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. हा बहुमताचा विजय आहे. हा तमाम शिवसैनिकांचा विजय आहे. जो संघर्ष केला त्याचा हा विजय आहे. हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय – शिंदे
