तब्बल ४ हजार लहान मुलांचे धर्मगुरुंकडून लैंगिक शोषण

पोर्तुगाल (वृत्तसंस्था): तब्बल ४ हजार लहान मुलांचे पोर्तुगालमधील कॅथलिक चर्चमधल्या धर्मगुरुंकडून लैगिंक शोषण झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. एका स्वतंत्र आयोगाने हा स्फोटक दावा केला आहे.


पोर्तुगालमधील बाल मानसोपचार तज्ज्ञ पेड्रो स्ट्रेच यांच्या नेतृत्वाखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार मागील ७० वर्षांत कॅथलिक धर्मगुरुंगकडून ४ हजार मुलांचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचं म्हटलंय. आयोगाच्या अहवालानुसार लैंगिक शोषण झालेल्या पीडित मुलांचं वय १० ते १४ च्या दरम्यान होतं. हा अहवाल म्हणजे केवळ हिमगनाचं टोक असल्याचं पेड्रो यांनी म्हटलंय. खरी आकडेवारी याहीपेक्षा भयंकर असल्याचा दावा पेड्रो यांनी केला आहे.


२०२१ मध्ये फ्रांन्सचा एक अहवाल समोर आला होता. या अहवालामध्ये ३ हजार कॅथलिक धर्मगुरुंकडून २ लाखांपेक्षा अधिक मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल नमुद करण्यात आलं होतं. त्यानंतर पोर्तुगालमध्ये या स्वतंत्र आयोगाकडून २०२२ मध्ये काम करण्यास सुरुवात करण्यात आली होती.


यातील अधिक धक्कादायक बाब अशी की, पोर्तुगालमधील सरकारी वकिलांच्या माहितीनूसार या प्रकरणांची सुनावणी होऊ शकते पण आरोपींवर कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे लैंगिक शोषणाचे नियम बदलले पाहिजेत, अशी मागणी आयोगाकडून करण्यात आली आहे. तसेच याआधीही ज्या धर्मगुरुंनी हे गुन्हे केलेले आहेत त्यांनाही शिक्षा मिळाली पाहिजे, असं मत आयोगाकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Iran-America-Pakistan : एकीकडे शांतिदूत होण्याचा प्रयत्न दुसरीकडे शत्रूराष्ट्राशी जवळीक; पाकिस्तानने अमेरिकेला इराणबाबत गुप्त माहिती पुरवली?

मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्धसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान

West Asia Conflict : सीझफायरनंतर इराणचा मोठा हल्ला; कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसाईल आणि ड्रोन हल्ला

इराण (Iran) आणि अमेरिकेदरम्यान (America) झालेल्या सीझफायरनंतर पुन्हा एकदा पश्चिम आशियात तणाव वाढल्याचे चित्र

Israel vs Lebanon : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला! ट्रम्प यांचा इशारा धुडकावून इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच; ड्रोन हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू

बैरूत : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)

Radical Jews Protest in Israel : इस्रायलमध्ये सक्तीच्या लष्करी भरतीविरोधात कट्टरपंथी ज्यूंचे आंदोलन

इस्रायलमध्ये सक्तीच्या लष्करी भरतीविरोधात सोमवारी हजारो अतिधार्मिक (अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स) ज्यू नागरिक

Balen Shah, Nepal PM : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना ब्रिटनने दिला धक्का

काठमांडू : भारत आणि नेपाळमधील सीमावाद सोडवण्यासाठी ब्रिटनची मदत मागणारे नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना