मुंबई: ९० च्या दशकात चित्रपटातील प्रसिद्ध नायिका म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीच्या सौंदर्याचे आणि तिच्या स्टाईलचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. वयाच्या ५३ व्या वर्षीही माधुरी तितकीच सुंदर दिसते. माधुरीकडे पाहून ती दोन मोठ्या मुलांची आई, असं कुणालाही वाटणार नाही. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांना अरिन आणि रायन नावाचे दोन मुलगे आहेत, जे आता हँडसम हंक बनले आहेत.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी नुकताच एका युट्यूबवर पत्नी माधुरी आणि मुलगा अरिन याचा व्हिडिओ शेअर केला. अरिन सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये शिकत आहे. दरम्यान व्हिडिओमधील अरिनच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अरिनचा नवा कूल लुक आणि त्याचा मेकओव्हर पाहून चाहतेही खूश झाले.
यावर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया मजेशीर आहेत. काहीजणांचे म्हणणे आहे की अरिन एखाद्या चित्रपटातील हिरोसारखा दिसत आहे. तर काहींनी चक्क अरिन हुबेहुब तरुणपणीच्या संजय दत्तसारखा दिसत असल्याचे म्हटलेय.
या यूट्यूब व्हिडिओमध्ये अरिनने आपल्या अमेरिकेतील अनुभव सांगितले. तो म्हणाला की, मला रात्री एकटे फिरायला आवडत नाही. जर रात्री उशिरा बाहेर जावे लागले तर मी फक्त माझ्या मित्रांसोबत जातो. याआधी माधुरी दिक्षितचा छोटा मुलगा रेयान नेनेही चर्चेत आला होता. त्याने तब्बल दोन वर्ष आपले केस वाढवून कॅन्सरग्रस्तांना दान केले होते.