
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या विजयासाठी भाजपसह मविआने कंबर कसली आहे.
कालच, गुरुवारी कसब्यातील हुकमी एक्का म्हणून परिचित असलेल्या गिरीश बापटांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्यातील पोटनिवडणुकीत प्रचारासाठी उतरणार आहेत.
पुण्यात येत्या २२ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांच्या दोन सभा होणार आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. तर कसबा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची सभा संध्याकाळी ४ ते ९ या वेळेत पार पडणार आहे. या दोन्ही ठिकाणी पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गिरीश बापटांना कसब्याचे किंगमेकर मानले जाते, तर, शरद पवारांना निवडणुकीतील गेमचेंजर मानले जाते. त्यामुळे पवारांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.